Motivational poem in Marathi
1. स्री म्हणजे खेळणं नव्हे खेळत आईच्या मांडीवर वाढले मी लाडात राणी लागले चालू दुडुदुडु अंगणी तेव्हा झाले होते मी खेळणं फक्त माझ्याच आईबाबांसाठी.... टाकले पाऊल समाजात सहजच दिसत होते बाहुलीसारखी छान वाटलं नव्हतं खरंच खेळणं बनेन शंका मनातली सत्यात ऊतरली संतापाची लकेर मस्तकात घुसली सांगावे वाटले ओरडून जगाला अरे!! स्त्री म्हणजे खेळणं नव्हे आहेत तिलाही भावना अन्.. आहे सुंदर हळवं मनसुद्धा विचार करा रे त्याचाही तुम्ही बंद करा तुमच्या वासनांध नजरा.. नाही व्हायचं मला खेळणं कुणाचं शिकायचयं प्रतिकार करायला ... अकारण होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविरुद्ध. बनवायचयं सक्षम मला करण्या उद्धार स्वतःचाच.. पाडण्या मुडदे अत्याचाऱ्यांचे 2. शिव छत्रपती रयतेचा राजा थोर शिवराय छत्रपती आदर्शांचा परिपाक सुप्रसिध्द राजनिती। चेतविला स्वाभिमान धन्य माऊली ती जीजा वीर रक्त प्रकटते धन्य पिता शहाजी राजा। कावा तो गनिमी धुव्वा शत्रूचा रणी धाडसाचे बाळकडू जणू वाघ रणांगणी। शूर वीर घडविले ध्येय स्वराज्य पुजिले निर्...