Love poem in Marathi
1. साथ – साथ
माझ्या अंगणी, तुझी पाऊले
आनंदाने नाचू दे
पावा माझ्या प्रेमाचा
तुझ्या अंतरी वाजू दे
प्रेमाचा प्राजक्त तुझा
माझ्या अंगणी खुलू दे
सर्वस्वाचे निर्माल्य होण्या
तुझ्या अंगणी फुलू दे
गीत तुझे माझ्या ओठी
मुक्तपणे गाऊ दे
आसमंतात तुझा नि माझा
सूर भरून राहू दे
नाचत गात सदा जीवनी
प्रेमभाव असू दे
एकमेकां साथ देऊनी
आयुष्य आपुले वसू दे
2. ती गुलाबी होती
ती माझी वाट गुलाबी होती,
अन् तिची साथ गुलाबी होती.!
तिच्या अन् माझ्या प्रेमाची,
यार ती बात गुलाबी होती.!
काळी सावळी थोडी नकटी,
मात्र ती फार गुलाबी होती.!
नष्ट केल्या मी प्रेमात जाती पाती,
ह्रदयात ती गुलाबी गुलाबी होती.!
लाजत वाचते ती कविता माझी ,
तिचीच कविता गुलाबी होती.!
मनात गुंतल्या मनाच्या गाठी,
ती अजन्म बंधने गुलाबी होती.!
डोळे लागताच ऒठावरचे तीळ,
वेडाच मी ती याद गुलाबी होती.!
———
3. तू येणा जरा तू येणा जरा
तुज्या विना तुज्या विना
ना कर्मे मला ना राहावे मला
तू येणा जरा तू येणा जरा
थोडीशी तुजी येण्याची
चाहूल मला देना जरा ………………
तुला बघितल्या वरती
माझे मन भारावून जाते
तुज्या ओठांन मधून शब्ध
ऐकायला कान माझे तरसुनी जातात
तू येणा जरा तू येणा जरा …………..
गुलाबाच्या पाकळ्या मध्ये
तुज्या प्रेमाचा गंध दरवडतो
फुलपाखरांन प्रमाणे
सर्वांना मोहीत करून जातो
तू येणा जरा तू येणा जरा ……………..
तुज्या चेहऱ्या वरील हसू
बघायला डोळे माझे आतुरता
तुला सांगताना मात्र
शब्ध माझे संपुनि जातात
तू येणा जरा तू येणा जरा
थोडीशी तुजी येण्याची
चाहूल मला देना जरा …….
———
4. कसा आहे ना मी
कसा आहे ना मी
मिठीत यायच्या आशेने कासाविस होतोय
Call वर मला तास पुरत नाहित बोलायला
अन ती समोर आल्यावर मात्र शब्दच फुटत नाहित…
कसा आहे ना मी
लवकर ये लवकर ये करून भेटायला बोलावतो
अन ऐन वेळी मात्र क्लास च्या कारणाने भलताच उशीर होतो
साध्या साध्या गोष्टीत मात्र सुख मानत असतो…
कसा आहे ना मी
खूप आवडतं ग मला तुला चिडवायला
अन तु समोर आल्यावर मात्र मला तेहि जमत नाही…
कसा आहे ना मी
सगळे म्हणतात मी खूप वेगळा आहे
आणि तू माझ्या प्रेमात पडल्यापासून तर तुही बोलतेस मी वेगळा आहे
मलाच समजत नाही माझ्यात काय असं वेगळपण आहे
असा कसा आहे ना मी…….
———
5. एकतर्फि प्रेम माझे एकतर्फिच रहिले
एकतर्फि प्रेम माझे एकतर्फिच रहिले,
मी पहातच रहिलो, अन तिने पहायचेच रहिले.- – –
स्वप्नत मझा रोज यायचि,
मि पहायचो, पन ति ना पहायचि.- – –
जिवापाड प्रेम करायचो तिच्यावर, तिला कधिच ना कळले
अन एकतर्फि प्रेम मझे एकतर्फिच रहिले. – – –
तिची याद मला रोज यायचि
अनवानि पायाने उन्हात चालावे, जखम ह्र्दयाला द्यायची. – – –
धाव- धाव धावत आहे, ती काहि मिळत नाही
या एकतर्फि प्रेमाचे पाऊल ह्रुदयाकदे काहि तिचा वळत नाहि. – – –
ऐक तर्फी प्रेम माझे एकतर्फिच रहिले
सुगध देता- देता आज गुलाबाचे फुलहि वाहिले. – – –
अजुनहि वेल आहे थोदी जानुन घे
या एकतर्फि प्रेमाला आपलस करुन घे. – – –
———
6. मी आणि तू
मी शब्द सारं होतो
तू कविता हो ना गं
मी ही कागद होतो
तू लेखणी हो ना गं
मी तो वेळ होतो
तू लुप्त सांज हो ना गं
मी ही प्राण होतो
तू हृदयाचे ठोके हो ना गं
मी निखळलेला वृक्ष
तू वेल वेडी हो ना गं
मी ही स्पर्श नाजूक होतो
तू सुंदर कळी हो ना गं
मी सोसाट्याचा वारा
तू वावटळ हो ना गं
मी ही आडोसा होतो
तू वेडी झुळूक हो ना गं
मी काठ पदराचा होतो
तू नक्षीदार साडी हो ना गं
मी ही नक्षीदार दार होतो
तू सजलेली रांगोळी हो ना गं
(कवी.अमोल शिंदे पाटील).
———
7. रुपगर्विता
चेहऱ्यावरती भाव रतीचे
मदनाची मंजिरी
घट्ट कंचुकी अशी बांधिली
उभार उरोजावरी
कमनिय बांधा सिंहकटी
सौंदर्याची पुतळी
असिधारा की नाजुक सुंदर
नाक चाफेकळी
अधरावरी कुणी सांडिली
बाल उषेची लाली
रंग संध्येचे छान उधळले
वनराणीच्या गाली
दो नयन ना, कमल दले
की भृंग कमलावरी
मधु चाखण्या टपून
बसली काव्यरसिका परि
कृष्णकुंतल मेघ पसरले
नभांगणाच्या शिरी
केश रुपे अंग भिजविती
धुंद प्रणयाच्या सरी
रुपगर्विता हिरव्या रानी
उभी राहिली जशी
उतरून आली स्वर्गामधुनि
रंभा की उर्वशी
अशी अचानक कुठून आली
सौंदर्याची खणी
सलाम तुजला प्रेमदेवते
अखिलाची जननी
———
8. पहिला पाऊस आणि तू….
पहिल्या पाऊसात बर्फाचा गारा पडतात, त्या गारा जशा मातीत विरघळतात ना, तसंच माझ्यामध्ये विरघळणारी तू…..
स्वचंद आकाशामध्ये उडणार्या कोकिलेची कुहू कुहू, आणि त्या प्रमाणे गोड अशी हाक मारणारी तू….
दरवळणार्या मातीचा सुगंध, त्या सुगंधा सारख माझं आयुष्य सुखकर करणारी तू….
अंगावर पडणार्या थेंबातून तुझा स्पर्श जाणवून देणारी तू….
पहिला पाऊस जसा माती मधल्या बियांना रुजण्यासाठी उत्करशीत करतो, तसच माझा मधला आत्मविश्वास जागवून प्रेरणा देणारी तू….
पहिल्या पाऊसाची सर जशी, तशीच माझा आयुष्यात येणारी तू….
रिमझिम पाऊसाची, तसच माझ्यावर प्रेम बरसावणारी तू….
खूपच राग आला तर त्या विजे प्रमाणे माझ्यावर कडाडणारी तू….
दुःखाचं वादळ संपवून, सुखाचा गारवा आणणारी तू….
पहिला पाऊस आणि तू….
Comments
Post a Comment